| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसाय, गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात यवत पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ८५ हजार ७१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे..

ही कारवाई रविवार दि.  रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूर, यवत, कानगाव आणि दुबेवाडी परिसरात अवैध दारू व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत नांदूर येथील आरोपी धरता रामानंद गुडदावत याच्याकडून ३१५ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. यवत येथील हॉटेल कोल्हापूर तडका परिसरातून आरोपी शिवाजी शहाजी भोसले याच्याकडून विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

तर कानगाव येथील आरोपी सत्यजित रविंद्र कांबळे याच्याकडून २३ देशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच दुबेवाडी येथील आरोपी अंकुश नरबत्या गुडदावत याच्याकडून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारी भट्टी, लोखंडी बॅरल तसेच सुमारे १,००० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. तर कानगाव येथील आरोपी बाळासाहेब उत्तमराव अडागळे व नितीन एकनाथ फडके यांच्याकडून विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करत एकूण ६ गुन्हे नोंदविण्यात आले.यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक कठोर, सातत्यपूर्ण आणि प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आपल्या परिसरात अवैध दारू विक्री अथवा हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ यवत पोलीस स्टेशनला देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *