| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्यूज मराठीसाठी

यवत गावात धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टवरून उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना बुधवार, दि ६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

शुक्रवारी दि १ रोजी दुपारी गावात अचानक तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका अपमानास्पद पोस्टनंतर दोन गटांमध्ये वाद झाला. पाहता पाहता तो वाद हिंसक स्वरूपात परिवर्तित झाला. जमावाने दगडफेक, तोडफोड, दुकाने व धार्मिक स्थळांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे.

यवत गावात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन तत्काळ सक्रिय झाले. दंगल रोखण्यासाठी लाठीमार व अश्रुधुरांचा वापर करण्यात आला. या प्रकरणी पाच फिर्यादी यवत पोलिसात दाखल करण्यात आले आहे,

या प्रकरणातील १५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना शनिवारी दि २ रोजी दौंड येथे न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्यांना बुधवार दि ६ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

दरम्यान, यवत गावात अजूनही तणावपूर्ण शांतता असून संचारबंदी लागू करण्यात आले आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाचे प्रतिनिधी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *