| दौंड : प्रतिनिधी

  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत (ता. दौंड) येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी परतीच्या मार्गावर बुधवारी दि. १६ रोजी आगमन झाली. सकाळी १०.३० वाजता टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताकांचे साक्षीदार, हरिनामाच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

संतश्रेष्ठांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात झाला. यावेळी यवतकरांनी भक्तिभावाने पुरी-भाजीसह विविध पदार्थांचा महाप्रसाद तयार करून वारकऱ्यांना वाटप केला. परिसर भाविकांच्या जयघोषाने न्हालून निघाला होता.

या आधी पालखीने वरवंड येथे मुक्काम घेतला होता. सकाळी आरतीनंतर पालखीने देहूकडे प्रस्थान केले. यवत येथे दुपारच्या विसाव्यासाठी पालखी थांबली असता, वारकऱ्यांनी मंदिर परिसरात थोडी विश्रांती घेतली, तर भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले.

दुपारी सुमारे १२ वाजता पालखीने देहूकडे मार्गस्थ होत पुढील प्रवास सुरू केला. या वेळी श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

पालखीचा पुढील मुक्काम कुंजीरवाडी येथे असून,

१८ जुलै – श्री विठ्ठल मंदिर, नवी पेठ
१९ जुलै – पिंपरी गाव
२० जुलै – आळंदी (मुक्काम)
२१ जुलै – देहू येथे पालखी आगमन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *