| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीभावाने आणि उत्साहाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी दि १३ रोजी सायंकाळी पावणे सात वाजता दौंड तालुक्यातील वरवंड येथे श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी दाखल झाला. यवत ते वरवंड या मार्गावरील सुमारे २३ किलोमीटरचा कडक उन्हात पायी प्रवास पूर्ण करत पालखीने नियोजित मुक्कामस्थळ गाठले.
यवत येथील मुक्कामानंतर सोमवारी सकाळी पालखी सोहळ्याने वरवंडकडे प्रस्थान केले. मार्गातील विविध ठिकाणी वारकरी आणि भाविकांनी पालखीचे स्वागत केले. भांडगाव येथे पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांनी अल्प विश्रांती घेऊन पुढील प्रवास सुरू ठेवला.
https://www.instagram.com/reel/DavDMAcNMKt/?igsh=eWF6MnhmZWttMnk0
दुपारनंतर चौफुला परिसरात पालखीचे आगमन होताच आसपासच्या गावांतील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जमले होते. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगगायन आणि “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेत संतांच्या चरणी भक्तिभाव व्यक्त केला.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा वरवंड येथील चौकात पोहोचला. दिवसाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पालखीचा मुक्काम येथील विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आला. मार्गावर वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, चहा, अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, व्यापारी संघटना तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आली होती.
पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विशेष नियोजन केले होते. तसेच महसूल, पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनानेही आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.
वरवंड येथील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी पुढील टप्प्याकडे प्रस्थान करणार असून, वारकऱ्यांचा विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा उत्साह कायम राहणार आहे.