| बारामती : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
सन २०२३ साली बारामती शहरात ‘विराज फायनान्स’ नावाने फर्म सुरू करून “लोन कमी करून देतो” अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र भिमराव डोंबाळे (रा. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) आणि त्याच्या पत्नीवर बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दाम्पत्याने विविध घटकांतील लोकांकडून लोन क्लोज करण्याच्या नावाखाली पैसे घेतले आणि त्यांचा अपहार करून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. या गुन्ह्यानंतर आरोपी रविंद्र डोंबाळे पोलीसांना सतत गुंगारा देत फरार झाला होता.
बारामती शहर पोलिसांच्या गुन्हा प्रकटीकरण विभागाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून अखेर ता. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईत बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. शशिकांत चिवटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन राजन, पोलिस अंमलदार अमीर शेख, अभिजीत कांबळे, दत्तात्रय मढे, अक्षय शिंदे, निखिल नेवसे यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई मा. संदीपसिंह गिल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), मा. रमेश चौघुले (अप्पर पोलीस अधीक्षक पुणे), मा. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग), मा. सुरेश राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बारामती शहर पोलिसांचा तपास सुरू आहे.

