|दौंड : प्रतिनिधी

  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत (ता. दौंड) भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी २७ जून रोजी पहाटेच्या सुमारास एक तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा कसून तपास करत यवत पोलिसांनी खुनाचा छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खून केलेल्या तरुणाची ओळख लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकळी ढोकी, ता. व जि. धाराशिव) अशी झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाल्यानुसार आरोपींनी लखन याला भुलेश्वर मंदिर परिसरात बोलावून घेतले. तिथे झालेल्या वादातून त्याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर, पाठीवर आणि छातीवर गंभीर वार करण्यात आले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह पेटवून देण्यात आला.


या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या आरोपींची नावे योगेश दादा पडळकर (वय २५), रा. माळशिरस, ता. पुरंदर, राजश्री योगीराज पडळकर (वय २३), रा. माळशिरस, ता. पुरंदर, विक्रम आश्रुबा कोरडे (वय २९), रा. आनंदवाडी, टाकळी ढोकी, जि. धाराशिव, शुभम उमेश वाघमोडे (वय २२), रा. मुरुड, जि. लातूर, कैलास ढोलाराम माटे (वय ४२), रा. येवती, जि. धाराशिव) असे आहेत.



या सर्वांनी मिळून कट रचत लखन सलगर याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण आणि यवत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शुक्रवार, दि. १२ रोजी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.


भुलेश्वर हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई

भुलेश्वर पायथा यवत हद्दीत (ता. दौंड) येथील खळबळजनक हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तपासात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. ही कारवाई संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती) व बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा) व यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, महेश माने, प्रविण संपांगे,पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, सहायक पोलिस फौजदार सचिन घाडगे, पोलिस हवालदार मोमीन शेख, अजित भुजबळ, अजय घुले, संदीप देवकर, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, नारायण वलेकर, गणेश कर्चे, सुनील नगरे, विनायक हाके, संतोष कदम, प्रमोद गायकवाड, परशुराम म्हस्के, प्रमोद शिंदे, वैभव भापकर, धिरज जाधव, मारूती बाराते, विनोद काळे, दीपक वेताळ, प्रणव ननवरे, प्रतीक गरूड, शुभम मुळे, सचिन काळे, मोहन भानवसे, स्वप्नाली टिळवे,

या संयुक्त पथकाच्या शर्तीशोध आणि सतर्क कारवाईमुळे हत्येप्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे उकलले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *