| बारामती : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

बारामती ( ता. बारामती ) शहर पोलीस स्टेशन हद्दीत अलीकडेच सायबर फसवणुकीच्या तीन गंभीर घटना पोलिसांनी उघडकीस आल्या असून, या घटनांमधून नागरिकांनी विश्वास ठेवण्याआधी विचार करा हा महत्त्वाचा संदेश पोलिसांनी समोर आला आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांचा विश्वास जिंकून भीती किंवा लोभ निर्माण करत आर्थिक फसवणूक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट झाले आहे.

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 45 लाखांची फसवणूक


पहिल्या घटनेत 74 वर्षीय ज्येष्ठ महिलेला WhatsApp व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटक वॉरंटची भीती दाखवली. “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली महिलेला मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या Fixed Deposit (एफ.डी.) तोडून विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारात आरोपींनी तब्बल ₹45.60 लाख लंपास केले.

ट्रेडिंग स्कॅममध्ये 1.30 कोटींचा गंडा


दुसऱ्या घटनेत एका नागरिकाला “Stock Market Experts” या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी करून घेत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला खोटा नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर वारंवार गुंतवणुकीस प्रवृत्त केले. शेवटी ॲप बंद करून आरोपी फरार झाले. या प्रकरणात संबंधित नागरिकाची ₹1.30 कोटी इतकी फसवणूक झाली.

ऑनलाईन बँकिंग हॅक | 92 लाखांचा अपहार

तिसऱ्या घटनेत कोणताही OTP किंवा कॉल न घेता थेट खात्यात घुसखोरी करून IMPS व RTGSद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. गिरीराज हॉस्पिटलसह संबंधित खात्यांतून एकूण ₹92.50 लाख रक्कम अपहार करण्यात आली. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या तिन्ही घटनांतून सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती स्पष्ट होत असून, ते आधी विश्वास निर्माण करतात, नंतर भीती किंवा लालच दाखवून पैसे उकळतात. पोलीसांनी नागरिकांना खालील सूचना केल्या आहेत की कोणताही अधिकारी फोन/व्हिडिओ कॉलवर अटक करण्याची धमकी देत नाही. तसेच
Guaranteed Profit  किंवा Double Money यांसारख्या   आमिषांपासून दूर राहा,

अनोळखी ॲप किंवा लिंक डाउनलोड करू नका,

OTP, PIN, पासवर्ड कोणालाही देऊ नका,

AnyDesk, TeamViewer सारखी ॲप्स अज्ञात व्यक्तींसाठी वापरू नका,

सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे..

बारामती शहर पोलीसांनी तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असून, काही रक्कम गोठवण्यात यश मिळाले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *