| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दि, ३० सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे येणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा दौंड तालुका दौरा निश्चित झाला असून प्रशासनाने नियोजित कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांसाठी त्यांचा महाराष्ट्रात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील पाटस येथे मंगळवार दि, ३० रोजी त्यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्थळ पाहणी केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे, या पाहणीत तालुक्याचे आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील फुलारी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी पोलिस दौंड बापूराव दडस, यवत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.
