| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पाटस येथील डॉ. संदीप घोले यांच्या फार्मवर ऊस आणि कांदा पिकासंदर्भात मार्गदर्शनपर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा (दौंड) आणि संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला गेला आहे.
या परिसंवादात ऊस पिकावरील मार्गदर्शनासाठी सुरेश माने पाटील ( ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे ) तर कांदा पिकावरील व्याख्यानासाठी डॉ. दत्तात्रय वने ( कृषीभूषण, महाराष्ट्र शासन २०११ ) यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरुण अण्णा भागवत यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, बारामतीचे
टी. के. चौधरी , कृषी अधिकारी, दौंडचे अजिंक्य दुधाने, तालुका गुणवंत नियंत्रण निरीक्षक, कैलास चव्हाण, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा विभाग महेश रूपनवर, अमोल निंबाळकर ( सिर्कोट स्टार्टअप ) तसेच कृषी विवेक मासिकाचे संपादक विकास पांढरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कड, समीर शेख आणि लोणकर साहेब (कृषी विभाग) यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप घोले आणि राजेश थोरात यांनी मानले.
ऊस पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना सुरेश माने पाटील यांनी ऊस पिकातील बारकावे शेतकऱ्यांना समजावून सांगत म्हणाले की, “उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असला तरी जमिनीची ताकद वाढवून योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पादन शक्य आहे,” जमीन मशागत, सरीमधील अंतर, बेणे निवड, रोग-कीड नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, “एकरी ६० टन उत्पादनासाठी सुमारे ७५० प्रति गुंठा खर्च येतो, तर १०० टन उत्पादनासाठी सुमारे १००० प्रति गुंठा खर्च अपेक्षित आहे.”
कांदा पिकावर सखोल मार्गदर्शन करताना डॉ. दत्तात्रय वने यांनी बियाणे निर्मितीपासून ते कांदा काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले पाणी व्यवस्थापनातील चुका साठवण काळ कमी करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तुषार व ठिबक सिंचनाच्या योग्य वेळा, प्रमाण, व गणिती मांडणी त्यांनी सविस्तर सांगितली.“एकरी दोन लाख रोपे लागवड केल्यास आणि सरासरी १०० ग्रॅम वजनाचा कांदा मिळाल्यास, २० टन उत्पादन सहज शक्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या परिसंवाद दरम्यान विविध कृषी कंपन्यांचे SP ऍग्री इनोवेशन, SP कृषी नेचर, गुरुदत्त ऍग्रो एजन्सी, ऑटोमेट एरिगेशन, सलाम किसान कृषी ड्रोन, लीफ बायोसिस, डिजिटल खेती, UPL, सेतू फार्मर, प्रीमियर एरिगेशन, इको पेस्ट ट्रॅप, वेलकम ड्रीप आणि संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स यांचे माहितीपर स्टॉल्स लावण्यात आले होते.
SP ऍग्री इनोवेशनने कांदा लागवडीचे यंत्र वापरून प्रात्यक्षिक सादर केले. तसेच ऊस लागवड पद्धतींबाबत रेग्युलर, जोड ओळ, सहा फूट रुंद सरी पद्धत अशा प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
शेती प्लॉट वर शेतकऱ्यांना क्यूआर कोडद्वारे प्रत्येक प्लॉटचे नियोजन, खर्च आणि उत्पादन माहिती पाहता येईल, अशी डिजिटल सुविधा डॉ. घोले यांनी उपलब्ध करून दिली होती.
याबाबत त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकरी ते उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या डॉ. संदीप घोले यांनी गेल्या १७ वर्षांत आपल्या शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. २०१९ साली भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना देशातील प्रथम क्रमांकाचा कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, “केव्हीकेप्रमाणे माझ्या शेतावर प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याचे स्वप्न होते, आणि आज ते सत्यात उतरले आहे.” सुमारे ७०० शेतकऱ्यांनी या परिसंवादाचा लाभ घेतला असल्याचा आनंद होत शेतकरी म्हणून होत आहे..
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स टीममधील गणेश लोले, मच्छिंद्र गवारे, मनोज बारवकर, रावसो मुर्दांडे, बापू ठोंबरे, ऋषी ठोंबरे, विनोद शितोळे, विजय सांगळे, सचिन अवचर, पूजा कड, चैताली निंबाळकर, पूजा बोबडे, रेश्मा वाबळे, नेहा घोडे यांनी मोलाचे योगदान दिले.
