दौंड प्रतिनिधी

बीबीसीस्काय मराठी


दौंड शहरातील इयत्ता बारावीची परीक्षा संपल्यानंतर केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांंनीला दुचाकी आडवी मारुन अश्चिल हावभाव व इशारा करणाऱ्या रोडरोमीओ अरबाज शेख (रा-कस्तानचाळ दौंड,ता-दौंड,जि-पुणे ) यास दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,इयत्ता दहावी व बारावीची केंद्राची परीक्षा सुरू आहे.गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी पेपर सुटल्यानंतर अरबाज शेख याने पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीला मोटार सायकलवरुन पाठलाग करत कट मारला वअश्चिल हावभाव करत फोन करण्याचा इशारा केला होता तर तो वारंवार पाठीमागे येऊन त्रास देत असल्याचे तिने सर्व प्रकार आईला सांगितला‌.

संबंधित रोडरोमीओ हा पिडीत मुलीच्या घरासमोर उभा राहुन सिगारेट ओडत वाईट नजरेने उभा राहायचा तसेच त्याने मुलीच्या वडीलांना ही मारण्याची धमकी दिली असल्याने याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *