| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील नानगाव भागात रानशिकारी पकडण्यासाठी लावलेल्या फाशात एक बिबट्या अडकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली, ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.मात्र अनाथ प्रयत्न करून अडकलेल्या बिबट्याला रेस्कू करण्यात वनविभागाला यश आले आहे.
शुक्रवार दि ८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास आल्याने वनविभाला कळवले होते घटना लक्षात येताच दौंड वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला सावधगिरीने आणि सुरक्षितपणे फाशातून मुक्त केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वन्य प्राणी उपचार केंद्र, बावधन (पुणे) येथे पाठविण्यात आले आहे.
दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी या प्रकरणी सांगितले की, “बिबट्याचा जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत आणि त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. रानशिकारी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा फाशांमुळे असल्या प्राण्यांना धोका होऊ शकतो, त्यामुळे योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.”
ही घटना परिसरातील नागरिकांमध्ये शोकळा निर्माण करते, तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करते.