| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड पोलिस स्टेशन हद्दीत खडकी ( ता. दौंड ) येथे बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक करण्यात आली ही कारवाई दौंड गुन्हे शोध पथकाने तात्काळ माहितीच्या आधारे केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे..

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती की, खडकी ( ता. दौंड ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वैभव संजय शिंदे हा संशयास्पद हालचाली करत असून त्याच्याकडे अवैधरित्या शस्त्र असल्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी केली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत सुमारे ५३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशी दरम्यान आरोपीने सदर शस्त्र अवैधरित्या खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी भारतीय शस्त्र कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल पवन माने, संजय कोठावळे व नितीन दोडमिसे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *