| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ९ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पत्नी सारिका भरणे यांच्यासह उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कृषीमंत्री भरणे यांनी कोणत्याही औपचारिकतेचा आग्रह न धरता गावकऱ्यांसोबत पंगतीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यांच्या शेजारी सामान्य ग्रामस्थ बसलेले दिसत होते. यावेळी त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी भाविकांना प्रेमाने भोजन वाढले. उपस्थितांनीही ही सेवा आनंदाने स्वीकारली.
गावकऱ्यांनी सांगितले की, “मंत्री साहेबांचा हा साधेपणा आणि लोकांमधील मिसळण्याची वृत्ती त्यांना खऱ्या अर्थाने लोकनेता बनवते.”
या प्रसंगी परिसर भक्तिभावाने भरून गेला होता. विविध भागांतून आलेले भाविक एकत्र बसून भोजन घेत होते. समाजातील एकोपा, आपुलकी आणि सेवाभावाची प्रचिती येथे पाहायला मिळाली. मंत्री भरणे यांनीही सर्वांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या कार्यक्रमाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसून, सामाजिक आणि मानवी मूल्यांवर आधारित असतं.