| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड पोलिसांनी शहरातील शालीमार चौक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कल्याण मटका जुगारावर छापा टाकून दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१५ /२०२६  अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे..

या प्रकरणी पोलीस हवालदार अमिर जिलानी शेख यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चंदू राम नगरकर (रा. कोहीनूर अपार्टमेंटच्या पाठीमागे, दौंड) हा ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार चालवत होता. तसेच, या जुगारातून जमा होणारी रक्कम विल्यम अँटोनी आरीकम (वय ६५, रा. दत्तमंदिर परिसर, दौंड) यांच्याकडे दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार गुरुवार दि १८  रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शालीमार चौक येथील भावना हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कोहीनूर अपार्टमेंटच्या पाठीमागील आडोशाला पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपी जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले.

छाप्यात पोलिसांनी एकूण १२०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार भोसले यांनी पूर्ण केली आहे.

दौंड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *