| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात पुणे–सोलापूर महामार्गालगत मोठ्या पत्र्याच्या शेडमधून अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस दिशेने जाणाऱ्या सर्विस रोड लागत एका मोठ्या पत्राच्या शेड परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्या आहेत. व्यावसायिकाने बाहेरील भागातून आलेल्या तरुणी व महिलांचा वापर करून हा व्यवसाय चालविला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच काही तरुणांना विविध आमिषे दाखवून या जाळ्यात ओढले जात असल्याचीही चर्चा आहे.
या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. जर या ठिकाणी मानवी तस्करी, महिलांचे शोषण किंवा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असेल तर संबंधित महिलांची व तरुणींची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
नागरिकांनि दिलेल्या माहिती अशी की, वेश्या व्यवसाय सारख्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसराची प्रतिमा मलिन होत असून गुन्हेगारी प्रवृत्तींनाही खतपाणी मिळू शकते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी होऊ लागली आहे..
