| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पाटस ( ता.दौंड ) येथील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (दि. ५) रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या हाणामारी, दगडफेक आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल केले असून एकूण अठरा जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्री सिमेंट कंपनीत ट्रकमध्ये सिमेंट भरण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाल्याने त्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ट्रक चालक संतोष बाळकृष्ण कडू (वय- ४१ वर्षे) राहणार – बेटवाडी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार , शुक्रवार दि. ५ जून रोजी दुपारी अडीज च्या सुमारास पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी चर्चा सुरू असताना आरोपी १) सूरज राजेंद्र कु-हाडकर,२) अजय धोत्रे, ३) श्रीकांत पवार, ४) अनिल चव्हाण व इतर ३ जणांनी संतोष कडू यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी अजय धोत्रे याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज कु-हाडकर, अजय धोत्रे आणि अनिल चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
तर याच घटनेतील सूरज राजेंद्र कु-हाडकर (वय ३२ वर्षे ) रा. अंबिकानगर, पाटस, यांनीही यवत पोलिसात स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यामध्ये संतोष कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी गज व दगडांच्या साहाय्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी सूरज कुऱ्हाडकर व साक्षीदारांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १) संतोष कडू, राहणार बेटवाडी, तालुका दौंड तर २) आण्णा बाबू गायकवाड, ३) रावसाहेब गंगाराम पालवे, ४) सुधीर आण्णा फुलमाळी, ५ ) रामा बाजीराव गायकवाड, ६ ) अनिल रामा गायकवाड, व इतर पाच जण असे हे सर्व राहणार – जोशीवस्ती ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथील असून यांना अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहे.

