| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
राज्यात आदिवासी कोळी महादेव समाजातील विवाह विषयक वाढत्या समस्या लक्षात घेऊन समाजहिताचा अभिनव उपक्रम म्हणून आदिवासी कोळी महादेव समाज उन्नती संस्था, पुणे यांच्या वतीने राज्यव्यापी वधू–वर परिचय मेळावा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
सध्या समाजातील अनेक वधू–वरांचे वय वाढत चालले असून, अवास्तव अपेक्षा, पत्रिका दोष–गुणमिलन, तसेच एजंटमार्फत होणारी फसवणूक व अवाजवी फी यांमुळे विवाह रखडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय, निधी संकलनाचे गाजावाजा न करता आणि समाजाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र ही संस्था गेल्या काही काळापासून समाजातील वधू–वरांचे विवाह विनामूल्य जुळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेने मोबाईल माध्यमातून कोळी महादेव वधू–वर WhatsApp ग्रुप १, २ व ३ असे तीन गट तयार करून आतापर्यंत अनेक शुभविवाह विनामूल्य घडवून आणले आहेत.
या ग्रुपमध्ये २,००० ते २,५०० पेक्षा अधिक कोळी बांधव सक्रियपणे सहभागी आहेत. हडपसर येथे होणारा हा मेळावा काही ठराविक कोळी बांधवांनी लोकवर्गणीतून आयोजित केला असून, समाजासाठी समाजानेच उभारलेला हा उपक्रम ठरणार आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्रभरातून वधू–वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी हो अशी माहिती आदिवासी कोळी महादेव समाज उन्नती संस्था पुणे संस्थेचे संस्थापक गोविंद गायकवाड उपसंस्थापक शिवाजीराव शिंदे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी दिली आहे.
