| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आणि दौंड तालुक्याचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा हे आपल्या 500 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.
स्वप्नील शहा यांच्यासोबत दौंड तालुक्यातील सुमारे 200 कार्यकर्ते, तर इंदापूर, बारामती आणि शिरूर या तालुक्यांमधील अंदाजे 300 कार्यकर्ते असे मिळून एकूण 500 कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसणार असून, राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल हे भाजपचे आहेत.

स्वप्नील शहा हे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष राहिले असून, दौंड शहरात त्यांचा मजबूत कार्यकर्त्यांचा गट आहे.

या पक्षप्रवेशाची माहिती स्वप्नील शहा यांनी मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य पक्षप्रवेश सोहळा शुक्रवार दि. १७  रोजी दौंड शहरात होणार असून, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी स्वप्नील शहा असे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगरपालिकेत सत्ता बदल घडवून आणणार आहोत. पक्षाच्या विचारधारेत आणि कार्यपद्धतीत विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *