
दौंड : प्रतिनिधी
। बीबीसीस्काय न्यूज मराठीसाठी
वरवंड ( ता. दौंड ) ग्रामस्थांना दिवसभर जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळ्याची आतुरता लागली असताना हा पालखी सोहळा सालाबादप्रमाणे प्रमाणे गाव हद्दीत आल्यावर श्रीफळ पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले आहे मात्र हीच पालखी सोहळा गावात आल्यावर मात्र आकाशी फटाक्यांची आतिषबाजी सप्तपदी फुलांची रांगोळीत विठ्ठलाच्या जयघोष्यात ज्ञानोबा तुकारामांचा आवाजात वरवंड ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले आहे.
यवत ( ता. दौंड ) येथे श्री भैरवनाथ मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवार दि २३ रोजी दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामी असताना मंगळवार दि २४ रोजीच्या पहाटे वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला. हा पालखी सोहळा भांडगाव, बोरिपार्धी चौफुला येथील विसावा घेत सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास वरवंड हद्दीत प्रवेश केला, पालखी सोहळा मुक्कामी असणाऱ्या मंदिरात साडे सहा च्या सुमारास प्रवेश केला, यावेळी मंदिरात पादुका पूजन व सामूहिक आरती झाल्यास वारकरी व पालखी दिंड्या वरवंड ग्रामस्थांच्या जेवणासाठी मार्गस्थ झाल्या.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी गावकऱ्यांनी वारकऱ्यांची सेवेसाठी अतिशय उत्तम प्रकार नियोजन केले आहे,पालखी स्थळावर व गावात स्वच्छता, आरोग्य सुविधा,शौचालय युनिट, प्लास्टिक कचरा युनिट, राहण्याची आंघोळीची शॉवर द्यारे सोय, चोऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर व गाव परिसरात सीसीटीव्ही व पालखी सोहळ्याची माहिती देण्यासाठी गावात ठिकठिकाणी साऊंड स्पीकर लावण्यात आले होते.
दौंड तालुक्यात दोन दिवस मुक्कामी असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवार दि २४ रोजी वरवंड ( ता. दौंड ) मुक्कामी असताना बुधवार दि २५ रोजी पहाटे ६ वाजता ची आरती घेऊन तालुका वासियांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी पाटस दिशेने रवाना होणार आहे. तर दुपारचा विसावा पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता आगमन होणार आहे, तो दुपार पर्यंत विसावा घेणार आहे. मंदिरातून सकाळी सव्वा आकाराच्या दरम्यान वाजता रोटी घाट पार करण्यासाठी व पुढील प्रवासासाठी पालखी सोहळा बाहेर पडणार आहे.

