दौंड:प्रतिनिधी

पाटस (ता.दौंड) रोटी घाट पार करण्यासाठी यंदा मात्र सालाबादप्रमाणे प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज  पालखी सोहळ्यातील  रथाला  जादाच्या आठ बैल जोड्याची एकूण मिळून १६ बैलांची मदत घ्यायावी लागली नाही .तर यंदा पालखी रथाच्या पाच बैल जोड्या कमी करून तीन बैल जोड्या जादा लावून एकूण ६  बैलांच्या मदतीने पालखी रथाला घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेहून घाट पार केला.

श्री क्षेत्र देहू ते पाटस या दरम्यान पायी चालत आलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रोटी घाटातील मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी पुणे अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांनि व पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी मोठी गर्दी केली होती..

गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने हजेरी लावली असल्याने  रोटी घाट परिसर हिरवाईने नटलेला आहे.यंदा पालखी सोहळा नागरिकांना रोटी घाटात वेगळेच धार्मिक चैतन्य निर्माण करून आनंद देऊन गेला अनेकांनी रोटी घाटातील पालखी सोहळ्याचे मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासह मोबाईल मध्ये कैद करत सेल्फी काढल्या आहेत..

हिरवाईने नटलेल्या परिसरातील नागमोडी वळणाचा रोटी घाटात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवार दि ५ रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दाखल झाला असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास पालखी सोहळ्याची  जादा च्या तीन बैल जोडयानी एकूण सहा बैलांची  मदत घेऊन रोटी घाट पार केला..रोटी घाटात टाळ मृदुंगात विठ्ठल पांडुरण संत तुकाराम महाराजांच्या जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता..

सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदा पालखी रथाला जादा आठ बैल जोड्याची मदत घ्यावी लागली नाही यंदा मल पालखी रथाच्या पाच  बैल जोड्या कमी करून तीन बैल जोड्या लावून एकूण ६  बैलांच्या मदतीने पालखी रथाला घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेले असताना क्षणीचे मनमोहक दृश्य अनेकांनी आपल्या डोळ्यांनी व मोबाईल कॅमेराने टिपले आहे..

दौंड तालुक्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या सहवासाने तालुक्यात भक्तिमय वातावरण करून तालुक्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा रोटीच्या नागमोडी वळण घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी (ता.दौंड) येथे अभंग आरती करीत हिंगणीगाडामार्गे वासुंदे (ता.दौंड) येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री आठच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचला आहे..

ऐतिहासिक असलेला रोटी घाट पालखी मार्गाच्या चौपदरी कामात नाहीसा झाला आहे मात्र नव्याने तयार झालेला रोटी घाट परिसरात यंदा पावसाने आगोदरच हजेरी लावल्याने परिसर हिरवाईने नटाला गेला आहे मात्र पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळाला घाट पार करण्यासाठी  बैलजोड्यांची मदत घ्यावी लागेलच लागत आहे यामुळे घाटातील वातावरण पूर्वी प्रमाणेच दिसत आहे..मात्र घाटातील पालखी दृश्य पाहण्यासाठी तालुकासह व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा , कौठा , सिद्धटेक , राशीन,सह इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर तालुक्यासह बाहेरील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *