| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
_______
पाटस (ता.दौंड) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे पाटस गोलांडी मळा येथे गुरुवार दि १६ रोजी दुपारी एक च्या सुमारास शेळ्या मेंढ्याच्या कळापावर प्राण्यावर हल्ला केला आहे.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पाऊले उचलणे गरजेचे असताना या प्रश्नाकडे वनविभागाचे दुर्लक्ष करीत आहे तर वन कर्मचाऱ्यांचा बिबट्या प्रश्नकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे.
पाटस परिसरात काही दिवसांपूर्वी मोहितेवस्ती येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केला तर नुकतेच कुसेगाव येथील लहान बालकांवर बिबट्या सदृश वन्यप्राण्याने हल्ला केल्याच्या घटना घडली असताना वनविभागाने व वनकर्मचाऱ्याने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असताना मात्र वनविभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष असताना.
पाटस (ता.दौंड) गोलांडी मळा येथे दत्तू कोकरे यांचा शेळ्या-मेंढ्यांचा कळप चरण्यासाठी गेला असताना त्यांच्या सामोरे अचानक येऊन बिबट्याने शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला यात एक शेळी फस्त करून ओढत ऊसा त नेहली आहे तिचा शोध लागला नाही तर दुसरी शेळी गंभीर जखमी केली आहे तर बिबट्याने शेळ्यावर हल्ला केलेल्या ठिकाणी जाऊनक नुकसानीची पाहणी केली असल्याची माहिती पाटसचे वनरक्षक रामेश्वर तेलंग्रे यांनी माहिती दिली आहे.
दिवसा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी जाणाऱ्या मेंढपाळा समोर घडली आहे यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या पोटाची भूक भागवण्यासाठी आक्रमक झालेले आहेत या घटनेतून दिसत आहे शेतकरी व नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी ह्या परिसरतील बिबट्याला वनविभागाचे जेरबंद करणे गरजेचे आहे.मात्र आशा गोष्टींना वनकर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होऊ लागली आहे.

