दौंड :-
कडेठाण (ता.दौंड) येथे दहशती मध्ये माती उपसा सुरू असताना नागरी सुविधांची काळजी ते घेत नसताना अवैध रित्या वाहतूक होत असल्याची तक्रार अनेकांनी पोलीस महसूल विभागाकडे केली असल्याने हा उपसा बंद करून पंचनामा केला आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई महसूल विभागाकडून केली जाईल का ? याबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे…
कडेठाण ते दापोडी रस्ता लगत नावापूर्ती शासकीय रॉयटी काढुन कसलाच शासकीय नियमांचे पालन न करता माती उपसा सुरू केला होता,हायवा गाडी द्यारे वाहतूक नियम पायदळी तुडवून गावात दहशतीने माती उपसा सुरू होता मात्र त्यांच्याकडून नागरी सुविधा ची काळजी घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी या माती उपसा व वाहतुकीवर आवाज उठवून अखेर महसूल विभागाने पंचनामा करून माती उपसा बंद करण्याचे आदेश दिल्याने तो बंद करण्यात आला..
कडेठाण (ता.दौंड) येथे पाचशे ब्रास माती काढण्याची परवानगी संबंधित विभागाने दिली असताना सरकारी नियमांचे पालन करून हा माती काढण्याचे आदेश असताना आपल्याकडे कोण लक्ष देतो या हेतूने तीन जेसीबी मशीन व दहा ते बारा हायवा गाड्यांद्यारे हा माती उपसा करून पुढे विक्रीस नेहला आहे मात्र माती व्यवसायिकांनी अधिक पैसे मिळवण्याच्या हेतून पाचशे ब्रास च्या अधिक माती उपसा केला असल्याची लेखी अर्ज दौंड तहसील यांना काही नागरिकांनी केला होता.

