| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंडचे भूमिपुत्र दैनिक लोकन्याय संघर्षचे पुणे जिल्हा प्रतिनिधी जयदीप माणिक बगाडे यांना नांदेड येथे ‘तुफानातील दिवे’ या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जयदीप बगाडे यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन ‘तुफानातील दिवे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड महापालिकेचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. निमंत्रक संजय भाऊ निवडूंगे, सहाय्यक वामनराव कावळे, कांबळे तसेच सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. स्वागताध्यक्ष म्हणून गौतम कदम यांनी जबाबदारी सांभाळली.
यावेळी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, नागसेनदादा सावदेकर, कुणाल वराळे, अजय देहाडे, खरात ताई तसेच स्टार प्रवाह फेम बालगायक आणि अन्य कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांना अभिवादन व मानवंदना दिली.
जयदीप बगाडे यांच्या पुरस्काराबद्दल नांदेड येथील दैनिक लोकन्याय संघर्षचे संपादक बाजीराव गायकवाड पाटील, नांदेड जिल्हा प्रतिनिधी वनखाडे, सोनकांबळे मॅडम, गायकवाड सर तसेच इतर सदस्यांनी गेस्ट हाऊस येथे जाऊन त्यांचा सत्कार केला.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी, गब्बर सोनवणे व मित्र परिवार, मुजिम भाई व मित्र मंडळ, ‘वीर शिरोमणी’चे संपादक शंकर शेठ ठाकूर, ‘नंदगिरीचा कानोसा’चे संपादक शिकारे साहेब, नांदेडचे ज्येष्ठ नेते प्रभू सावंत तसेच भीमा कोरेगाव ग्रुपचे सर्वेसर्वा बी.बी. पवार व मित्र परिवार यांच्या वतीनेही जयदीप बगाडे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनीही जयदीप बगाडे यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. नांदेड शहरातील नागरिक, आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेम, सन्मान आणि शुभेच्छांबद्दल जयदीप माणिक बगाडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या पुरस्कारामुळे दौंडच्या पत्रकारिता क्षेत्रातही बगाडे यांच्या कार्याचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दौंडचे भूमिपुत्र पत्रकार जयदीप बगाडे यांना ‘तुफानातील दिवे’ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
