| बारामती : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
एम.सी.एन. न्यूज मराठीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे जिल्हा प्रतिनिधी व बारामती शहरातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख पत्रकार कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वर्धापन दिन सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पत्रकारिता तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत कृष्णमुर्ती जगताप यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर, बुऱ्हाणपूर रोड, जळगाव जामोद येथे झालेल्या या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील, नगरपरिषद जळगाव जामोदचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, ॲड. संदीप उगले, निलेश काळे, रमेश जाधव, अमोल चौधरी, डॉ. वाकेकर, संदीप देशमुख, डॉ. किशोर केला, सचिन तायडे, मुख्य संपादक शामभाऊ तायडे आणि संपादक राजुभाऊ वाढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील एम.सी.एन. न्यूज मराठीचे प्रतिनिधी, वाचकवर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारिता, सामाजिक कार्य, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृष्णमुर्ती जगताप यांचा गौरव करण्यात आल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
