| पुणे : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्यूज मराठी
पुणे येथील सरहद लॉ स्कूलमध्ये “कायदा व्यवसायातील महत्त्वपूर्ण पैलू” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त अनुज नहार आणि प्राचार्या सत्यवती राजेश खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या सत्रात प्रमुख वक्ते ओंकार पाटील यांनी कायदा व्यवसायातील विविध महत्त्वपूर्ण पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. व्यावसायिक नैतिकता, कायदा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, तसेच कायदा व्यावसायिकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समर्पण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर कायदा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या तज्ज्ञ सत्रात बी.ए. एल.एल.बी.च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच इयत्ता ११ वी व १२ वीचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे समन्वयन सहाय्यक प्राध्यापक उत्कर्षा धुमाळ, सहाय्यक प्राध्यापक कौशल बागुल आणि सहाय्यक प्राध्यापक स्वाती डिंबर यांनी केले. तृतीय वर्ष बी.ए. एल.एल.बी.चे विद्यार्थी सानिया खान, भक्ती परवाडे, निशा चौहान, आदित्य नवघणे आणि अभिनव भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रभावीपणे पार पाडले.
यावेळी अधिवक्ता सागर घोलवे, सहाय्यक प्राध्यापक संपदा कुलकर्णी, ग्रंथपाल मनीषा जगताप तसेच शिक्षकेतर कर्मचारी आकाश गपाट, सुनिता शिंदे आणि रेश्मा पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. यावेळी मान्यवर वक्ते, व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
