| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पाटस – दौंड अष्टविनायक महामार्गावरील गिरीम येथील वायरलेस फाटा परिसरातील समाधान लॉज येथे दौंड पोलिसांनी छापा टाकून अनैतिक व्यवसायाविरोधात कारवाई केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६  च्या कलम ३, ४  व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. ३० रोजीच्या पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास गिरीम गावच्या हद्दीतील वायरलेस फाटा, दौंड–पाटस मार्गावरील समाधान लॉज येथे छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान रितेश कुमार रमतारी पासवान ( वय-२६ ) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सहा महिलांमार्फत वेश्याव्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार निखिल बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली असून, संबंधित आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *