| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
गेल्या ३५ वर्षांपासून मी दादांसोबत काम करत आहे. दौंड तालुक्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रकल्पामागे त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन कारणीभूत आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आपली निष्ठा माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेल्या नात्याचा भावनिक उलगडा हजारो कार्यकर्त्या समोर स्पष्ट केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांचे हजारो समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अ. प ) गटात शुक्रवार दि १ रोजी जाहीर प्रवेश करण्यासाठी एकत्र आले. यावेळी वरवंड (ता. दौंड) येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना थोरात म्हणाले की, “पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. त्यांचा माल बाजारात योग्य भावाने विकला जावा यासाठी आम्ही दादांकडे ठाम मागणी करत आहोत.”
यावेळी, “नव्या राज्याच्या कृषी मंत्री म्हणून निवड झालेल्या दत्तात्रय भरणे उपस्थित असताना यांना शुभेच्छा देत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभकामना दिल्या.”
अजित पवार यांचे मार्गदर्शन: कार्यकर्त्यांना प्रेरणा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना संघटना बळकट करण्याची आवश्यकता आणि स्थानिक पातळीवर काम करण्याचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यावर भर देणे आवश्यक आहे. इथे नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे सुरू आहेत, त्यात रिंगरोड, रेल्वे लाईन, पुरंदर विमानतळ आणि वंदे भारत ट्रेन यांचा समावेश आहे.”तसेच, “दौंडजवळ लवकरच एक भव्य शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या नेतृत्वाची ओळख होईल,”
“थोरात यांचा पक्षप्रवेश राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या राजकीय बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल आणि दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारेल,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावपातळीवरील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरवंड परिसरात उत्साहाचे वातावरण होते, आणि कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या जल्लोषात सामील झाले होते.
रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प )मध्ये प्रवेशामुळे दौंड तालुक्यातील पक्षसंघटन मजबूत होण्याची आशा आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा जोरदार प्रचार होईल आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी चर्चा नागरिकांच्यातून होऊ लागली आहे.

