| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय मराठीसाठी
स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरातील दुर्दैवी घटना आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगतीने न्यायालयात खटला चालवण्याची आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी केली.
पंढरपूर वारीसाठी व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजन मंडळींवर स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात सोमवारी दि. ३० जून पहाटेच्या सुमारास भीषण हल्ला झाला. दोन अज्ञात युवकांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यात मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले.
या सोबतच, त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला,
आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत अशी मागणी केली की, “संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा. तसेच, दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी आहे.
दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

