| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

वाखरी ( ता. दौंड ) येथील अंबिका कला केंद्र, येथे सोमवार दि. २१ रोजी रात्री नृत्य कार्यक्रम सुरु असताना बंदुकीतून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी यवत येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.



याबाबत फिर्यादी बाबासाहेब राजश्री अंधारे (वय ३८ वर्षे, सध्या रा. आनंदग्राम, वाखारी) यांनी यवत पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सोमवार दि. २१ रोजी, रात्री १०.३० वाजता अंबिका कला केंद्र येथे रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरु होती. यामध्ये पाच महिला सहभागी होत्या. साधारण सव्वा अकरा वाजता कर्मचारी युवराज चंदन याने धावत येऊन फिर्यादी यांना सांगितले की, अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे.

फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता, तिला तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. यानंतर चौकशी दरम्यान समोर आले की, कार्यक्रमादरम्यान आरोपी बाळासाहेब मांडेकर यांनी नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला. गोळी भिंती व छतावर आदळली. त्यावेळी उपस्थित गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून घटनास्थळावरून गाडीतून निघून गेले.

त्यानंतर सदर  ठिकाणाची पाहणी केली असता, भिंत व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसून आले. फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा सापडला, जो फिर्यादीने ताब्यात घेऊन पोलिसांकडे जमा केला.

या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड विधानातील BNS कलम 125 व आर्म्स ॲक्ट 3 (25) नुसार कारवाई सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *