| बारामती : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर होते. सहयोग निवासस्थानी आगमन झाल्यानंतर एका कार्यकर्त्याने नवीन फॉर्च्युनर गाडी पूजनासाठी आणली होती. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले.
पूजनानंतर गाडी मालकाशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “गाडी चालवताना सुरक्षितपणे चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा. मी पुण्यात असताना अनेकांना नियम मोडताना पाहिले आहे. तसं करू नका, नियम पाळा.” असा सल्ला त्यांनी दिला.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.