दौंड:प्रतिनिधी
।बीबीसीस्काय न्यूज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच तृप्ती दादा भंडलकर, पती दादा भंडलकर यांच्यासह १९ जणांवर राजेंद्र झेंडे यांना जातीवाचक शिवीगाळ करणे, बेकायदा जमाव जमावुन कोणताही प्रशासकीय आदेश नसताना, कोणाताही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना, कुटुंबाचे उदार निर्वाह करण्याचे दुकान उध्वस्त करून दुकानातील साहित्य व रोख रक्कमेसह ४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेल्या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी सह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ११ फेब्रुवारी रोजी विद्यमान सरपंच व यांचे पती आणि गावातील एका व्यक्तीचे भांडण झाल्याने पाटस गाव बंद ठेवण्यात येणार असल्यांचा संदेश प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाला होता.त्यामुळे सदर घटनेची बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार राजेंद्र झेंडे हे पाटस येथील महाराष्ट्र बँकेसमोर गेले होते.त्यावेळी सरपंच यांचे पती दादा जनार्दन भंडलकर व संभाजी किसन चव्हाण हे जवळ आले, तू गावाची बदनामी करतोस, खोट्या बातम्या देतोस. तु बाहेर गावाहून पोट भरायला आलाय, तुला लय माज आला आहे का असे म्हणून जातीचा उल्लेख करीत, सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दादा भंडलकर म्हणाला की उद्या तुझी टपरी काढून फेकून देतो. तुझ्या घरावर हल्ला करून तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारतो, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, कारण पाटस गाव आमच्या आधीन आहे. माझी पत्नी पाटस ग्रामपंचायतीची विद्यमान सरपंच आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झेंडे यांचे जुने तलाठी कार्यालय लगत असलेल्या स्वमालकीचे दुकानाचे कुलुप तोडून,तोडफोड करून लोखंडी पत्र्याची टपरी ८५ हजार, कॉप्युटर ६० हजार, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर ३० हजार, लेपटॉप ३५ हजार, कलर प्रिंटर ५० हजार रुपये, लेमिनेशन मशीन ६,५०० फँन ६ हजार, ३ खुर्ची १० हजार, वायफाय ६ हजार, शालेय साहित्य ३५ हजार, इन्व्हर्टर ३० हजार, झेरॉक्स मशीन ६५ हजार, फर्निचर ४० हजार, फरशी, सिमेंट बांधकाम १५ हजार, त्याचप्रमाणे पाचशे रुपयांच्या ४० नोटा, दोनशे रुपयांच्या २० आणि शंभर रुपयांच्या दहा नोटा असे रोख रक्कम २५ हजार असे एकूण ४ लाख ९७ हजार ५००/- रुपये किमंतीचा तसेच वरील सर्व साहित्याचे बील, महाराष्ट्र बँकेचे चेक बुक पत्रकारीतेचे तसेच शासकीय निशासकीय गोपनीय कागदपत्रे असे साहीत्य कोणतेही पुर्व कल्पना न देता व झेंडे हे उपस्थित नसताना घेऊन गेले. तसेच दुकान पुर्णतः उध्वस्त केले.
या प्रकरणी दादा जनार्दन भंडलकर, तृप्ती दादा भंडलकर ( विद्यमान सरपंच ), संभाजी किसन चव्हाण,दिगंबर उर्फ सुनिल चंद्रकांत शितोळे, झहीर सत्तार शेख,स्वप्नील गणपत निंबाळकर,( सर्व रा.पाटस ता.दौंड जि.पुणे.) इतर १० ते १५ जणांच्या (नाव पत्ता माहीत नाही) विरुद्ध फिर्याद दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर इसमांनी झेंडे यांच्या कुंटुबाचे उदारनिर्वाहाचे साधनाचे नुकसान केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर इसम हे अत्यंत गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना राजकीय लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पासून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून त्यांनी घरावर हल्ला करून संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याची आणि माझ्यावर खंडणी आणि महिला पुढे करून खोटे नाटे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्याद झेंडे यांनी यवत पोलिस ठाण्यात दिल्याने ॲट्रॉसिटी, बेकायदा जमाव जमावणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर इसमांनी झेंडे यांच्या कुंटुबाचे उदारनिर्वाहाचे साधनाचे नुकसान केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर इसम हे अत्यंत गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना राजकीय लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पासून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून त्यांनी घरावर हल्ला करून संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याची आणि माझ्यावर खंडणी आणि महिला पुढे करून खोटे नाटे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्याद झेंडे यांनी यवत पोलिस ठाण्यात दिल्याने ॲट्रॉसिटी, बेकायदा जमाव जमावणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस हे करीत आहेत.

