| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पाटस ( ता. दौंड ) येथील प्रगतशील शेतकरी डॉ. संदीप घोले यांना भारत सरकार यांच्या कडून वर्ल्ड कल्चर अँड एनवोर्मेन्ट प्रोडक्शन कमिशन यांच्या वतीने नुकताच भारत गौरव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार दि, २८ जून रोजी दिल्ली येथे पार पडला गेला, या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी कमांडर विजय बावेला, ग्रुप कॅप्टन सुरेश कुमार, कर्नल वेद प्रकाश भार्गव, डॉ राकेश रंजन, स्वामी कृष्ण चरणानंद, डॉ. सप्तर्षी बोश आणि अभिनेता बिंदू दारा सिंग ह्या मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. संदीप घोले यांनी शेती क्षेत्रात आज पर्यंत केलेल्या कामाची ही पावती आहे. आपल्या शेती मध्ये नवनवीन प्रयोग करून याचा फायदा शेतकरी वर्गाला कसा होईल याकडे डॉ. घोले यांनी विशेष लक्ष दिले आहे.
डॉ, घोले यांनी कांदा बिजोत्पादन, कांदा पिकाचे पूर्ण शेड्युल असेल. जमीन सजीव कशी बनवावी एकरी १०० टन ऊस उत्पादनची सूत्रे, यासाठी गावोगावी जाऊन व्याख्याने देत आहेत. शेती मधील प्रयोगा बरोबर व्यवसाय शून्यातून उभा केला व्यवसाय यामध्ये संदीप प्याज बायो ऑर्गानिक्स कंपनी, ऊस रोपवाटिका अशा अनेक माध्यमातून शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविदा तयार केल्या आहेत.
त्यांनी ठिकठिकाणी कंपनी आउटलेट टाकून शेतकऱ्या पर्यंत पोहोचवल्या, तसेच डिजिटल खेती च्या माध्यमातून ऍप तयार केले. या ऍप मध्ये ए,आय ( AI ) तंत्रज्ञान, हवामान, बाजारभाव, फवारणी वेळ, आणि शेती शी निगडित लेख आणि व्हिडिओ यांचा समावेश आहे. कोणताही पुरस्कार मिळाला की आपली जबाबदारी अजून वाढते असे डॉ. संदीप घोले आवर्जून सांगत आहे.
या पूर्वी डॉ. संदीप घोले यांना कांदा बिज ( संदीप प्याज) ही जात तयार केल्या बद्दल राष्ट्रपती पूरस्कार, शेती क्षेत्रात भरीव कामा बद्दल वसंतराव नाईक पुरस्कार. कांदा पिकातील डॉक्टरेट पदवी. अशा अनेक पुरस्काराने डॉ. संदीप घोले यांना सन्मानित करण्यात आले आहे.

