| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे छुपा प्रचार जोरात सुरू असून, पाटस पंचायत समिती गणात राजकीय वातावरण नितीन शितोळे यांच्या मुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे पुणे जिल्ह्यात पसरलेल्या शोककळेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या राजकीय सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाटस गणात भाजपकडून नितीन शितोळे यांना उमेवारी देण्यात आली असल्याने घर टू घर अशा प्रचारावर कार्यकर्ते व त्यांनी स्वतः  भर दिला असून, मतदारांच्या गाठीभेटी घेत समस्या जाणून घेण्याला प्राधान्य दिले आहे.

राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली असून, उमेदवारांना प्रचारासाठी काहीसा जास्तीचा वेळ मिळाला आहे. या काळात कोणतीही शक्तीप्रदर्शनाची सभा न घेता, नितीन शितोळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी पाटस परिसरातील वाड्या-वस्त्या, कुसेगाव, रोटी आणि बिरोबावाडी या गावांमध्ये वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

नितीन शितोळे आपल्या प्रचारात पत्नी व माजी सभापती आशा शितोळे यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत आहेत. विशेषतः कोरोना काळात शितोळे यांनी जी आरोग्य सेवा दिली, त्याची जाणीव मतदारांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच पाटस परिसरात आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे त्यांच्या प्रचाराची मुख्य ताकद ठरत आहेत.

पाटस गणात नितीन शितोळे यांच्या पाठीशी तरुण मतदारांची मोठी फळी दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचून मतदारांच्या समस्या सोडवण्याचे ठाम आश्वासन ते देत आहेत. या ‘होम टू होम’ प्रचाराला मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पाटस गणातील लढत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र आमदार राहुल कुल यांनी पाटस गणात केलेली विकासकामे आरोग्याची कामे तसेच शितोळे यांनी नागरिकांना केलेली मदत व कोरोना काळात रुग्णसेवा अशा विविध कामांची पावती नागरिक शितोळे यांना देऊन नितीन शितोळे या गणात सहज रित्या विजयी होतील असा ठाम विश्वास माजी सरपंच संभाजी खडके यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *