दौंड:प्रतिनिधी  

बीबीसीस्काय मराठीसाठी

दौंड येथील महावितरण उपविभाग कार्यालयात लाईनमन दिनानिमित्त श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या व जनतेचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या वीज यंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीज क्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी ४ मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि ४ रोजी महावितरणच्या दौंड उपविभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीज सुरक्षेची शपथ देण्यात आली.

याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता विक्रम चव्हाण यांनी लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देत लाईनमन हे महावितरण चा महावितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.जनमित्र ऊन वारा पाऊस कोरोना सारख्या महामारी तसेच अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी २४ तास अविरत सेवा देतात.तरी सर्वांनी वीज सुरक्षेच्या नियमांचे पालन करून तसेच सुरक्षा साधने वापरून सुरक्षित काम करावे व दुरुस्तीच्या कामात सुरक्षतेशी तडजोड करू नका कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तरी महावितरण साठी लाईनमन हा महत्त्वाचा दुवा हा आहे असे ते म्हणाले लाईनमन प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी उपविभागीय कार्यालयातील अभियंते,जनमित्र कर्मचारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाची प्रस्तावना कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे यांनी केली व उपस्थितांचे आभार नितीन मेंगावडे मानले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *