| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

कानगाव ( ता. दौंड ) येथे कांद्याला ३५ रुपये हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आक्रोश कृती समितीच्या धरणे आंदोलनाला आज सातव्या दिवशी ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर गावातील आठवडे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला.

कृषी प्रधान भारतात शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळणे, शेतकऱ्यांवर कर्जाची वाढ, आणि आत्महत्यांची घटना ही केंद्र व राज्य सरकारसाठी मोठी चिंता आहे. आज देशभर आणि राज्यभर शेतकऱ्यांच्या आंदोलना जोर धरत आहेत. कांदा, उस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला यांसह अनेक पिकांना परवडेल असा बाजारभाव उपलब्ध नाही. त्यावरच बदलत्या हवामानामुळे अतिवृष्टी, ढगफुटी आणि कमी वेळात पडणारा पाऊस या अडचणींनी शेतीवर मोठा फटका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे.

कानगावमधील शेतकरी, शेतकरी महिला वर्ग आणि व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलनाचे समर्थन करत, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील इतर गावांनाही या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून, त्याची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणे अत्यावश्यक आहे.

या आंदोलनात भानुदास शिंदे, भाऊसाहेब फडके, सयाजी मोरे, रामदास पवार, गणपत नलावडे, संतोष गवळी, नारायण फडके, दादासो गवळी, राजेंद्र मोरे, किसन चौधरी, नामदेव फडके, डॉक्टर बापूराव फडके, संभाजी फडके, राम कोर्हाळे, नाना गवळी, राजेंद्र फडके, दत्तात्रय फडके, विश्वनाथ जाधव, बबन कोर्हाळे, लालचंद कोळपे, बापूराव कोर्हाळे, तसेच व्यापारी वर्गातील राहुल धर्माधिकारी, गणेश सपकाळ, रोहित फडके, सोनू शेख, निलेश गवळी, विकास खराडे, नाना जाधव, आनंद दिवेकर, विशाल गवळी, महेश जगताप, रोहन सरडे, विजय जाधव, नानासो सरडे, दिनेश सावंत, पापाभाई शेख, नितीन फडके, संतोष फडके, राजेश थोरात, जावेद शेख, नाना भाई शेख, निलेश चौधरी, शरद गवळी, दादा चव्हाण, योगेश चौधरी, रमेश जाधव, संतोष साळुंके यांचा सहभाग आंदोलनात झाला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *