| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कानगाव ( ता. दौंड ) येथील शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून बुधवार दि, २४ रोजी कानगाव गावातील आठवडे बाजार बंद ठेवून ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थ व व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन शेतकरी आक्रोश कृती समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला तन, मन, धनाने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या गावातील सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने, बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहेत.
यावेळी भानुदास शिंदे, रामदास पवार, सयाजी मोरे, भाऊसाहेब फडके, धनंजय गवळी, संतोष गायकवाड, राजेंद्र मोरे, बाळासाहेब फडके, शरद फडके, नामदेव फडके, विठ्ठल कोर्हाळे, संतोष निगडे, प्रकाश जाधव, वसंत गवळी, नामदेव निगडे, ज्ञानदेव गायकवाड, मच्छिंद्र गवळी, भाऊसाहेब रोडे, अशोक फडके, रोहिदास कोलते, श्रीधर नलवडे, दीपक फडके, दादासो गवळी, डॉ. बापूराव फडके, रामभाऊ फडके, किसन चौधरी, संभाजी फडके, दत्ता मुळेकर, भाऊसाहेब महाडिक आदींसह अनेक ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे कानगाव गावातून शेतकऱ्यांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा मिळत असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
