| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथे शेतकरी पांडुरंग बरळ यांच्या शेतीला भेट देत माहिती घेतली या भेटीत त्यांच्या साधेपणाचे विशेष दर्शन घडले.

मंत्री गोगावले यांनी शेतातील जांभूळ, पॅशन फ्रुट, पेरू आदी फळबागांची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीतील अडचणी, उत्पादन खर्च आणि फळबाग व्यवस्थापन याबाबत माहिती घेतली.

विशेष म्हणजे पाहणीदरम्यान त्यांनी शेताच्या बांधावरच भारतीय बैठक घेत गरम जेवणाचा आस्वाद घेतला. कोणताही लवाजमा न करता, स्थानिक पातळीवर शेतकरी दिलेल्या जेवणावर ताव मारला.

या साधेपणामुळे उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थ भारावून गेले. मंत्री गोगावले यांचा हा शेतकऱ्यांप्रती आपलेपणाचा आणि सादगीचा दिलखुलास प्रत्यय होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *