| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
आमदार राहुल कुल यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामे, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेली कामे तसेच कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांसाठी दिलेली मदत व केलेली सेवा यामुळे जनतेला फायदा झाला आहे. मी मागील पाच वर्षात पाटस गणातूनच नव्हे तर पाटस परिसरात ही कामे करत जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जनता भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देईल, असा ठाम विश्वास पंचायत समिती गणातील नागरिक व्यक्त केला आहे.
पाटस जिल्हापरिषद गटातील पाटस गणात नितीन शितोळे हे भाजप पक्षाचे उमेदवार आहे. पाटस गणातील प्रचार दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना यावेळी उमेदवार नितीन शितोळे म्हणाले की, आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पाटस परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनतेची कामे झाली आहेत. या विकासकामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे.
कोरोनाच्या संकट काळात गरजू रुग्णांना उपचार मिळावेत, औषधे व आवश्यक मदत वेळेवर पोहोचावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी वैयक्तिक लक्ष दिले आहे, तसेच मी सुधा कोरोना काळात जनतेची रुग्णसेवा केली आहे. त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून, हाच विश्वास या निवडणुकीत मतपेटीतून दिसून येईल अशी जनता चर्चा करीत आहे..
पाटस पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, निवडून आल्यास नागरिकांच्या प्रश्नांना मागील काळासारखे प्राधान्य देऊन आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे..

