एकत्र मिळून काम केले तर अनेक ठिकाणच्या विधानसभा जिंकू शकतो कारण या सरकारने गरीब दलित आदिवासी महिला आशा लोकांवर अन्याय केले आहे महाराष्ट्रातू भाजप घालवा म्हणजे दिल्लीतून मोदी जाण्यास वेळ लागणार नाही जेथे जिथे रामाचे तीर्थ स्थान होते तेथे भाजपचा पराभव झाला महाराष्ट्रात पुजारी बदलाचे काम आपल्याबरोबर जनता करणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे..

महाराष्ट्रातील जनतेला सध्याच्या सरकारचा प्रचंड राग आहे  महायुती सरकार घालवण्याची लोकांची इच्छा आहे हे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) गटाचे चाराचे आठ खासदार झाल्याने पक्ष स्वच्छ झाला तर शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना फसवल त्यांनी जायला नव्हतं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातील लोकांच्यात आहे हे लोकसभेला जनतेचे दाखवून दिले आहे यामुळे  आपण सरकार चा पराभव करू शकतो हे महाराष्ट्रातील जनतेला कळाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  शिव स्वराज्य यात्रा  पाटस येथील कार्यक्रमात दिली आहे..

पाटस (ता.दौंड) येथे रविवार दि ११ रोजी शिव स्वराज्य यात्रा  कार्यक्रमात ते बोलत होते ..यावेळी खासदार सुप्रिया सुळे,खासदार अमोल कोल्हे,खासदार बजरंग सोनवणे शितोळे,तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,प्रशांत शितोळे,नामदेव ताकवणे,अजित शितोळे,विधितज्ञ उदय फडतरे,दिग्विजय जेधे,मेहबूब शेख आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील दोन मराठी नेत्यांचे पक्ष फोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडल्याचा राग जनतेच्या मनात प्रचंड राग आहे.महाराष्ट्रात काही लोकांना बदनाम करून करून जेल मध्ये टाकण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे याच विरोधात जनता असल्याने चारशे पार जाणाऱ्या सरकारला दोनशे चाळीस वरच थांबवले आहे..

महाराष्ट्रातील कांदा संपल्यावर माफी मागायला शेतकऱ्याकडे जातात शेतकऱ्यांच्या दुधाचे हाल होते तेव्हा २५ रुपयाला दूध विकत होता त्यावेळी सरकार काही केले नाही त्यानंतर मात्र पाच रुपयांची घोषणा केली.आज देशातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटाला तोंड देत आहे पण शेतकऱ्याकडे लक्ष देयला सरकारला वेळ नाही हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचे नाही सोयाबीन कांदा कापूस आशा पिकांना सरकार बाजारभाव देत नाही यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात गेले आहे..

तर खासदार अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले की,लोकसभेची निवडणूक ही स्वाभिमानाच्या बाजूने उभी राहणारी निवडणूक होती,सरकार लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे ल योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या पक्षाचे बटन दबाव लागेल असे सरकार मधील नेते बोलत आहेत हे त्यांचे अपयश आहे ,ज्या शेतकऱ्यांनी कांदा २० रुपयाने विकला मात्र याच तालुक्यातील आमदार सांगतोय ३५ रुपयांच्या खाली शेतकऱ्यांनी कांदा  विकला नाही हे दुर्दैव आहे..

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आपला पक्ष फोडला पण मतदार आणि स्वाभिमानी जनता आपल्याकडे राहिला सामान्य कार्यकर्ता व  तळागाळातील  मतदारांनाशी संबंध ठेवला तर आपण जिंकूच शकतो हे लोकसभा निवडणुकीत शिकायला मिळाले आहे विरोधकांनी माझ्यावर टीका व अनेक कुरखुड्या मतदारसंघात केल्या पण माझा मतदार संघात तळागाळातील मतदारांचा संबंध असल्याने त्यांच्या टिकेल उत्तर याच जनतेचे दिले आहे..येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी कुटुंब म्हणून एकत्रित काम करायचे आहे तर दौंड मध्ये इच्छुक उमेदवार जास्त आहेत कोणीही नाराज होऊ नये नये येणाऱ्या  पंधरा ते  वीस दिवसात सर्व्हे करूनच उमेदवार दिला जाणार आहे.

तर आप्पासाहेब पवार,खासदार बजरंग सोनवणे ,दिग्विजय जेधे,नामदेव ताकवणे,अरुणा दिवेकर,भानुदास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *