दौंड:प्रतिनिधी

सभा शास्त्राच्या सुसंस्कृत विचाराने दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुरुवात करणाऱ्या चेअरमन तथा आमदार राहुल कुल अखेरच्या टप्प्यामध्ये पाणी नाही आल्यावर काय कुसाळ कारखान्याला घालणार का ? आशा स्वरूपाचा आसंस्कृत शब्द वापरल्याने या सभेचे अखेर शाब्दिक वस्त्रहरण झाले की काय असा गैरसमज होणे साहजिकच आहे,तशी चर्चा ही कारखाना स्थळावर रंगली होती.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि २८ रोजी दुपारी एक वाजता कारखाना स्थळावर संपन्न झाली असताना सुमारे तीन तास अधिक ही सभा विविध विषय निघाल्याने वादग्रस्त होत असताना कॅनोल पाण्याच्या विषयाची ठिणगी पडताच पाणी आणले नसते तर कारखान्याला काय कुसळ घातली असती का ? हा शब्द चेअरमन यांच्या कडून निघाल्याने सभेतील सभा शास्त्राचा सुसंस्कृतपणा दाखवणाऱ्या कारखान्याच्या चेअरमने कुसळ घालणार का? आशा स्वरूपाचा असंस्कृत पणाचा शब्द वापरला गेला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली या सभेसाठी आमदार कुल यांचे कट्टर विरुद्ध रमेश थोरात, महानंदाच्या माजी चेअरमन वैशाली नागवडे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि विद्यमान शरद पवार गटाचे नामदेव ताकवणे,भाजपाचे दुसरे माजी तालुका अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे,विद्यमान रमेश थोरात गटाचे कार्यकर्ते,शिवसंग्रामचे वसंत साळुंखे,राजाभाऊ तांबे,अरविंद गायकवाड या विरोधकांनी सभा जोरदार पणे गाजवली आहे.

यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांनी प्रथमच कुल यांना घाम फुटला होता.कारखाना चालवायला दिला आहे की विकला आहे,त्याची माहिती सभासदांना का? दिली नाही .मागील काळातील शिल्लक राहिलेल्या साखरेचे काय झाले ,कारखाना किती वर्ष चालवायला दिला,कारखान्याच्या कर्जाचा नक्की आकडा किती, या प्रश्नांनी मोठा गोंधळ झाला होता..
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना कूल यांची दमछाक झाली त्याच परिस्थितीमध्ये कुला ना साथ देणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा अर्जुन ओरडून जीवाचा आटापिटा होताना दिसला.त्यात विरोधक मात्र हटत नव्हते तात्या ताम्हाणे यांना बोलून न दिल्यामुळे त्यांनी माईक फेकला होता.

रमेश थोरात यांनी मागील साखरेच्या बाबतचा विषय वारंवार उपस्थित केला मात्र त्याला बगल देऊन त्याची परफेक्ट माहिती देताना कुल यांनी ते टाळण्याचा सविस्तर प्रयत्न केला गेला..
कारखाना नक्की कोण चालवतोय निराणी ग्रुप.का “साई प्रिया यावरून बराच ताण तणाव निर्माण झाला मात्र याबाबत समर्पक उत्तर कुल हे देऊ शकले नाहीत कारखान्याच्या संदर्भामध्ये कुल यांनी काही काळ जिल्हा बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता.

या बाबतची सविस्तर माहिती जिल्हा बँकेकडे असताना सुद्धा संचालक रमेश थोरात यांना ती कशी नाही या बाबतचा त्यांनी मुद्दाम प्रश्न उपस्थित करताना रमेश थोरात यांनी राज्य बॅंकेची तुम्ही या संदर्भातली सगळा करार केल्यामुळे जिल्हा बँक पासून अभिज्ञ आहे अशा स्वरूपाचा खुलासा केल्यावर मात्र कूल यांनी आपला विषय आवरता घेत या कारखान्यासाठी नामदार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मिळून मदत केलेली आहे.अशा स्वरूपाची सावध भूमिका व्यक्त केली.या सर्व भानगडी मध्ये कारखाना स्थळावरती मोठा गोंधळ सुरू होत होता आम्हाला बोलायला द्या अशा स्वरूपाची मागणी विरोधक करत होते तर त्या विरोधकांना अडवण्यासाठी आणि त्यांना खूप घालण्यासाठी कुल समर्थकांनीही आम्हाला बोलायचं आहे अशा स्वरूपाचा गोंधळ निर्माण केल्यामुळे ही सभा जवळपास तीन तास सुरू होती..
सभा सुरू असताना सुद्धा कुठल्याही स्वरूपाच्या सविस्तर प्रश्नावरती ती सभासदांना ऐकण्यास मिळाली नाही ही सगळ्यात मोठी कमालीची बाब म्हणावी लागेल अखेरच्या क्षणांमध्ये कॅनॉलचे पाणी आणि या प्रश्नावरती विरोधकांनी जोर धरल्यानंतर पाणी आणले नसते तर तुम्ही कारखान्याला कोसळ दिली असती का? अशा स्वरूपाचा शब्दप्रयोग कुल यांनी केल्याने या सभेची सुरुवात सभा शास्त्र अशा सुसंस्कृत शब्दाने करणाऱ्या कुल यांनी अखेर शेवटच्या क्षणी मात्र सुसंस्कृतपणा दाखवला आहे आणि खऱ्या अर्थाने सभेचे या निमित्त वस्त्रहरण झाले की काय असा शाब्दिक प्रयोग गमतीने नागरिक करू लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *