| पुणे : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पुणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाजपत्रक तयार केल्यामुळे स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप ठेकेदार डॉ. प्रविण शिवाजी कदम यांनी केला आहे. या निषेधार्थ त्यांनी जिल्हा परिषद पुणे येथे अमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
याबाबत ठेकेदार डॉ. कदम यांनी अशी माहिती दिली की,अंदाजपत्रकातील तांत्रिक चुकांबाबत मी वेळोवेळी विभागाला लेखी आणि मौखिकरित्या कळवले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. उलट संपर्क क्रमांक ब्लॉक करून मला काम पूर्ण करण्यास भाग पाडले. चुकीच्या हेडमुळे काम करताना मोठे आर्थिक नुकसान झाले.
ते पुढे असे म्हणाले की, “नुकसान भरपाईसाठी केलेल्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करून माझे बिल अडवले गेले. माझ्या तक्रारीनंतर अंदाजपत्रकात चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले, जे पूर्णतः अनैतिक आहे. मी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आहे.”
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी अभियंता पाथरवट साहेब यांनी कारवाईसाठी दहा दिवसांची मुदत मागितली असून, त्यानुसार डॉ. प्रविण कदम यांनी उपोषण 26 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे.
ठेकेदारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

