| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून राहु, यवत आणि खामगाव हे इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव ठरले आहेत. त्यामुळे या तिन्ही पैकी एका गणातूनच दौंड पंचायत समितीचा सभापती निवडला जाणार आहे. परिणामी या तीन गणांतील ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतांनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जानेवारी २०२६ पूर्वी होणार आहेत. याअगोदरच पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण ४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. त्यानंतर तालुक्यातील १४ गणांच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

सोमवार  दि.१३ रोजी दौंड प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अरुण शेलार यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. ही सोडत एका लहान मुलाच्या हस्ते चिट्ठी काढून पार पडली.

लोकसंख्येच्या प्रमाणावर आधी अनुसूचित जातींची सोडत काढण्यात आली, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या अपुरी असल्याने त्यांचा गण निघाला नाही.

प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :
) अनुसूचित जाती (महिला) – गोपाळवाडी, खडकी
२) इतर मागास प्रवर्ग (ओबीसी ) – खामगाव, राहु (महिला), यवत (महिला)
३) सर्वसाधारण महिला राखीव – बोरीपार्धी, देऊळगाव राजे, पारगाव, बोरीभडक
४) सर्वसाधारण (खुला गट) – वरवंड, पाटस, केडगाव स्टेशन, कानगाव, कुरकुंभ.

या प्रक्रियेला नायब तहसीलदार तुषार बोरकर, ममता भंडारे-देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *